Recent Tube

Breaking

Wednesday, September 3, 2025

माढा लोकसभा मतदारसंघाला १३ नवीन पोस्ट ऑफिसेसची मंजुरी- खा धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुरव्याला यश



माढा लोकसभा मतदारसंघाला १३ नवीन पोस्ट ऑफिसेसची मंजुरी-  खा धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुरव्याला यश



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


 

अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघात तब्बल १३ नवीन पोस्ट ऑफिसेस सुरू होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मतदारसंघात नवीन पोस्ट ऑफिसेस सुरू करण्यासंदर्भात केलेल्या मागणीला यश मिळाले आहे..


नवीन मंजूर झालेली पोस्ट ऑफिसेस पुढील गावांमध्ये सुरू होणार आहेत  सांगोला तालुक्यात वाणी चिंचाले, सोनलवाडी; करमाळा तालुक्यात हिवरे, आळजापूर; माढा तालुक्यात गवळेवाडी; माळशिरस तालुक्यात मारकडवाडी; पंढरपूर तालुक्यात पिराची कुरोली, करोळे तसेच माण तालुक्यात कारखेल, हिंगणी, जांभूळनी, ढाकणी व सोकासन.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा, पत्र व्यवहार, आधार लिंकिंग, विमा योजना व इतर टपाल सुविधा गावाजवळच उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेकडो नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहे.


या संदर्भात खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील सामान्य माणसाला केंद्र सरकारच्या विविध योजना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी या पोस्ट ऑफिसेस महत्त्वाची भूमिका बजावतील. यासाठी केंद्रीय संचार मंत्री मा. ज्योतिरादित्य शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानतो.




No comments:

Post a Comment