वगसम्राट
तु गुलाब होता अंगार होता
कला अविष्काराचा श्रृंगार होता
तु गण गवळण आणि वग होता
.तु सुर ताल लय यातला नग होता
तु ढोलक ढोलकी हलगी डफ होता
तु तमाशा नावाच्या कलेचा जप होता
तु राजा पोलिस सोंगाड्या भट होता
तु चाळ घुंगरू नृत्य दिग्दर्शक नट होता
तु लावणी गाणं नाचण्यातला प्राविण्य होता
तु कला अदाकारीला निपुण नाविन्य होता
तु पिटी तबला तुणतुणं पाठीवरली थाप होता
तु प्रेक्षकांच्या ह्रदयावरती केलेली छाप होता
तु राग संयम शांतीचा मिलाप होता
तु काळ वेळ नियमाचा अलाप होता
तु माणुसकी चा मोह माया होता
तु आमच्या साठी झिजवली काया होता
तु हास्य स्वागताचा सादर साकार होता
तु दिव्य आगमनाचा आदर आकार होता
तु विलोभनीय देखणा नटसम्राट होता
तु गुलाबराव ढालेवाडीकर वगसम्राट होता
कवी . संतोष होवाळ वाकी शिवणे



No comments:
Post a Comment