शहिद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने सांगोल्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला (प्रतिनिधी ) शहिद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य यांचा भव्य असा कार्यक्रम रविवार दिनांक 28 |09| 2025 रोजी दुपारी 12:00 वाजता, स्थळ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह (टाऊन हॉल) सांगोला,जिल्हा सोलापूर येथे होणार आहे.
बहुजनावर होणाऱ्या अन्याय,अत्याचार व भ्रष्टाचार विरुद्ध लढा देणारी एकमेव संघटना म्हणून बहुजन हक्क अभियान, महाराष्ट्र राज्य यांची अशी ओळख आहे.तसेच सर्व प्रकारच्या वतन इनाम शेत जमिनी बाबतचे आज वरचे झालेले बेकायदेशीर गैर हस्तांतरण रद्द करण्याबाबतची सखोल चर्चा यामध्ये होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून बहुजन हक्क अभियान, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा श्री.दयानंद एस. बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष,मा श्रीनिवास वाघमारे प्रमुख संघटक, महाराष्ट्र राज्य हे आहेत.
तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. रफिक बागवान (अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष ) मा. राजू चव्हाण (सर) जिल्हा अध्यक्ष )
मा.अजय प्रक्षाळे ( जिल्हा उपाध्यक्ष) मा.अहद काझी (जिल्हा कार्याध्यक्ष ) मा.कीर्तीपाल घोडकुंबे (सोलापूर शहराध्यक्ष)
मा. लैला जमादार / अष्टूळ मॅडम (महिला शहर अध्यक्ष)
मा.अनिता बनसोडे (सोलापूर महिला शहर सचिव ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
व या कार्यक्रमासाठी निमंत्रित मान्यवर म्हणून मा.साहित्यिक प्रकाश काशिळकर ( बहुजन समाजाची स्थिती व पुढील आव्हाणे )
मा. ॲड. विक्रांत लोकरे ( आजची सामाजिक परिस्थिती व कार्यकर्ता)
मा. आयु. सिद्धार्थ कसबे (माजी सहाय्यक पोलीस आयुक्त )
मा. आयु. कुंदन बनसोडे (बहुजन चळवळीतील नेते )
तसेच या कार्यक्रमाचे आयोजक मा.सिद्धेश्वर यादव (तालुका अध्यक्ष)
मा.प्रशांत चंदनशिवे (तालुका उपाध्यक्ष )
मा.सतीश काटे (तालुका कार्याध्यक्ष)
मा. सत्विक नवघरे (तालुका सचिव )
मा.विनायक गंगणे (तालुका सहसचिव ) हे आहेत.
पुढील काळामध्ये ही संघटना सर्व नागरिकांच्या विविध प्रश्नावरती लढा देणार असल्याची माहिती देण्यात आले आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.कालिदास कसबे यांच्या वतीने करण्यात आले आहे.





No comments:
Post a Comment