डॉ सौ निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यात नवरात्री महोत्सवानिमित्त 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' या अभियाना अंतर्गत डॉ सौ निकिता ताई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
गुरुवार दिनांक 25/ 9/ 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र महूद बु,
शुक्रवार दिनांक 26/ 9/ 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरा
शनिवार दिनांक 27/9/ 2025 रोजी प्राथमिक जिल्हा परिषद शाळा जुनोनी
सोमवार दिनांक 29/ 9/ 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र घेरडी या ठिकाणी होणार आहे.
तरी या मोफत भव्य आरोग्य शिबिराचा सांगोला तालुक्यातील गरजू महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
या मोफत भव्य आरोग्य शिबिरामध्ये कॅन्सर तपासणी, शुगर तपासणी, बी. पी तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.



No comments:
Post a Comment