Recent Tube

Breaking

Thursday, September 25, 2025

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण आखावे--आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख



युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण आखावे--आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीची बैठक आज मंत्रालय मुंबई येथे पार पडली त्यावेळेस युवा धोरण समितीचे सदस्य व लोकप्रिय आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी त्या बैठकीस हजर राहून राज्यातील युवकांच्या वेगवेगळ्या समस्या व विषयावर चर्चा केली


 त्यावेळेस आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणाची गरज असल्याचे सांगितले तसेच राज्यातील तरुणांना शिक्षण,रोजगार, आरोग्य व सामाजिक न्यायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी मांडलेल्या या विषयावर समीतीमधील इतरही सदस्यांनी योग्य ते धोरण ठरवण्याबाबत सर्वांनी सकारात्मकता दखवली.

 आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी अल्पावधीतच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये नागरीकांच्या सर्वांगीण विकासासाच्या विषयावर आवाज उठवलेला होता.आमदार साहेबांनी आज झालेल्या युकांच्या सर्वांगीण विकासासाच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या राज्य युवा धोरण समितीच्या बैठकीमध्ये युवकांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली असल्याचे मत प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले

No comments:

Post a Comment