सांगोला तालुक्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचा कोळा जिल्हा परिषद गटातील हातीद पंचायत समिती गणाचा दौरा संपन्न
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचा कोळा जिल्हा परिषद गटातील हातीद पंचायत समिती गणातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी हटकर मंगेवाडी, गुनाप्पावाडी, जुजारपूर, तिप्पेहळी, जुनोनी, गौडवाडी या गावातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्याचे आश्वासन आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिले.
या दौऱ्यामध्ये आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले
आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या या गाव भेट दौऱ्यास नागरिकांचा उस्फूर्तपणे सहभाग दिसून आला
आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या गाव भेट दौऱ्यामुळे नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे
या गाव भेट दौऱ्यास आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सेवा सोसायटीचे आजी-माजी चेअरमन व संचालक तसेच शेतकरी कामगार पक्षाचे व पुरोगामी युवक संघटनेचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते







No comments:
Post a Comment