छोट्या प्रणवने खाऊचे पैसे निवडणुक निधी म्हणुन दिला..त्याचा आमदार साहेबांनी सत्कार केला
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना.आपले उमेदवार डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे सोनके गावात प्रचारासाठी गेले आसताना सोनके गावातील प्रणव गणेश माळी या लहान मुलाने स्वताच्या खाऊ साठी साठवलेले पैसे त्यावेळेस निवडणुकीसाठी आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांना दिले पैसे साठवलेला डबा (गल्ला) आमदार साहेबांच्या स्वाधीन केलेला होता...
आमदार झाल्यानंतर बाबासाहेब देशमुख गावभेट दौरा करीत असताना सोनके गावात गेले असता.
आमदार साहेबांनी त्या लहानशा प्रणव बद्दल विचारणा केली त्याला समोर बोलावुन त्याचा सन्मान स्वता आमदार साहेबांनी केला.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी या लहान मुलाने केलेली मदत मी आयुष्यभर विसरणार नसल्याचे आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
त्यावेळेस सोनके गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आसल्याची माहीती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली



No comments:
Post a Comment