मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांना दिले आश्वासन
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
उद्या बुधवारी गणरायाचे आगमन होत असल्याने राज्य मंत्री मंडळाची बैठक एक दिवस अगोदर मंगळवारी पार पडली ..त्या दरम्यान सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय युवा आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणविस साहेब यांची मुबई येआज मु़बई येथे भेट घेतली.
आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतादार संघातील जे प्रश्न प्रलंबीत आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन दिले.सांगोला विधानसभा मतदार संघात काही विकासाभिमुक कामे प्रलंबित आहेत.त्या मध्ये शेतकरी,कष्टकरी ,कामगार यांच्या संबंधित बहुतांश कामे आहेत तसेच सांगोला शहरातील अनेक प्रश्न आहेत ते ही सोडवणे गरजेचे असल्याचे मा.मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनास आमदार साहेबांनी आणुन दिले.तसेच ग्रामीण भागातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असल्याचे ही आमदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना लेखी स्वरुपात सांगीतले.
त्याच बरोबरीने नव्याने काही कामे विकासाची कामे होणे गरजेचे आहेत.त्या ही कामांचा सदर निवेदनामध्ये समावेश करण्यात आला आहे.
सदर भेटी नंतर मा.मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांनी सदर निवेदन स्विकारले व सरकार सदर मागण्यांबाबत लवकरच तोडगा काढेल व विकासाला चालना देईल असे आश्वासन आमदार बाबासाहेब देशमुख यांना दिले आसल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.



No comments:
Post a Comment