Recent Tube

Breaking

Saturday, August 23, 2025

आ.बाबासाहेब देशमुख यांनी पुरग्रस्तांना दिला दिलासा

 



आ.बाबासाहेब  देशमुख यांनी पुरग्रस्तांना दिला दिलासा


सध्या राज्यामध्ये पावसाने हा-हाकार माजविला आहे.महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे..राज्यातील अनेक नद्यांना महापुर आला आहे..

  उजनी धरण क्षेत्रात मुबलक पाऊस झाल्याने प्रशासनाने भिमा नदीला अतिरिक्त्त पाणी सोडुन दिले ..त्यांचा परीणाम भिमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन भिमा नदीला  पुराचा धोका निर्माण झालेला आहे.भिमा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.तसेच नदीकाठच्या गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरी पाण्याखाली गेल्याने पाणी पुरवठा विहरीवरील  साहीत्य ,विजेचे खांब याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी पंढरपुरचे तहसिलदार मा.सचिन लंगोटे व ईतर अधिकारी वर्गास सोबत घेऊन  खेडभाळवणी व शेळवे येथे नदीकाठी जाऊन पुरपरस्थीतीची माहीती घेतली‌.व स्थानीक नागरीका कडुनही पुरामुळे झालेल्या नुकसानीची  सविस्तर माहीती घेतली.व  पंढरपुरचे मा.तहसीलदार लंगोटे साहेब यांना सदर नुकसानीची माहीती राज्य सरकारकडे पाठवुन देण्याच्या सुचना दिल्या तसेच पुरग्रस्तांना तातडीच्या प्राथमीक उपाययोजना करण्याच्या सुचना मा.तहसीलदारांना   आमदार साहेबांनी दिल्या.तसेच आमदार साहेबांनी पुरग्रस्त नागरीकांना दिलासा देताना सांगीतले काहीही आडचण आली तर मला तात्काळ कळवा मी आपल्या पाठीशी खंबीर पणे आहे ..त्यांच्या या एका वाक्याने नागरीकांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण झाली. आपल्या पाठीशी कोणी तरी आहे.नागरीकांना याचे  हायसे वाटले.आनंदाच्या वेळी तर‌ कोणीही सहभाग नोंदवत असते परंतु संकट काळी धाऊन येणारा हा साधा -सरळ आपल्या हक्काचा  आमदार आहे अशी चर्चा नागरीकांमध्ये पहावयास मिळाली..या भेटी दरम्यान खेळभाळवणी व शेळवे येथील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित आसल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

No comments:

Post a Comment