Recent Tube

Breaking

Friday, August 29, 2025

संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मोर्चात डॉ निरंजन केदार यांनी मोफत दिली वैद्यकीय सेवा




संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मोर्चात डॉ निरंजन केदार यांनी मोफत दिली वैद्यकीय सेवा



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614




संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मोर्चास सांगोला तालुक्यातील मराठा बांधव सांगोला ते आझाद मैदान मुंबई येथे मोर्चास जात असताना 


 या मोर्चामध्ये सांगोला तालुक्याचे  सुपुत्र डॉ निरंजन केदार हे स्वतः सहभागी होऊन मोर्चास जाणाऱ्या मराठा बांधवांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचे काम डॉ निरंजन केदार यांनी केले आहे.


 या मोर्चा मधील मराठा बांधवांची विचारपूस करून त्यांना औषध गोळ्या देऊन त्यांची तब्येत ठीक करण्याचे काम  डॉ निरंजन केदार यांनी केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


सांगोला सकल मराठा बांधवांनी या मोर्चास जाताना रुग्णवाहिका घेऊन गेल्यामुळे या मोर्चातील रुग्णांना रुग्णवाहिका फायद्याची ठरली आहे.


"सांगोला ते आझाद मैदान आसा आमचा 500 गाड्यांचा ताफा आहे सोबत सुसज्ज असे डॉक्टर्सची टीम आहे नरसिंग स्टाफ, ब्रदर्स स्टाफ आहे सर्वजण आम्ही काल सकाळपासून सांगोल्यातून निघाल्यापासून ते आतापर्यंत काल रात्री आम्ही आझाद मैदान येथेही जाऊन सेवा दिली व तसेच जे काही बांधव अपघात झालेला असेल अशांना सुरक्षित हॉस्पिटल ठिकाणी पोहोचविण्याची जबाबदारी घेतली आहे आणि ती आम्ही पार पाडत आहे - डॉ निरंजन केदार"

No comments:

Post a Comment