सांगोला तालुक्यासह कर्नाटक राज्यातील अनेक गावांची मोठी अडचण दूर होणार
प्रफुल्ल कदम यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय बैठकीमध्ये कडलास रस्त्याबाबत महत्वपूर्ण निर्णय
कडलास गावातील प्रमुख नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये झाला निर्णय
कडलास गावचा रहिवासी अंकुश जगताप या तरुणाचा कडलास जवळील रस्त्याच्या खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी रस्ते विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करावी अन्यथा त्याच खड्ड्यांमध्ये उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शासनाला दिला होता.
या पार्श्वभूमीवर सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रफुल्ल कदम,राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व कडलास गावचे प्रमुख नेते व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पाऊस असो अथवा नसो येणाऱ्या शुक्रवार पर्यंत रस्ता दुरुस्त करून ट्राफीक साठी योग्य केला जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याच बरोबर रस्ता कायमस्वरूपी भक्कम व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी वादग्रस्त 900 मीटर साठी 3 कोटी 55 लाख रुपये पेक्षा जास्त किमतींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो केंद्र सरकारकडे सोमवार पर्यंत मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये काळी माती काढून त्या ठिकाणी कठीण मुरूम भरून त्याच्यावर खडीकरण व नंतर डांबरीकरण प्रस्तावित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मयत अंकुश जगताप यांच्या कुटुंबाला अर्थसहाय्य होण्यासाठी प्रस्ताव देण्याचा निर्णय घेण्यात आला.शुक्रवार पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी योग्य नाही झाल्यास राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
या बैठकीस प्रफुल्ल कदम सह राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता शेख के.एफ., शाखा अभियंता पी. एफ.सुतार तसेच कडलास गावचे जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड,शिवाजीराव गायकवाड, सरपंच रूपाली साळुंखे, महादेव गायकवाड, समाधान पवार,माजी उपसरपंच सुनील गायकवाड, दत्ता जाधव,पप्पू पाटील, सचिन चव्हाण, लव्हाजी जगताप, कोमल पाटील प्रशांत पवार,दत्ता काशीद, सुरेश केदार, संग्राम गायकवाड, गणेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य शिवप्रसाद गायकवाड, निलेश अनुसे, अक्षय बागल, बंडू लवटे शुभम लिगाडे,दत्ता पवार,अभिषेक शेटे, वैभव लेंडवे,बापू माने आदी मंडळी उपस्थित होती.



No comments:
Post a Comment