Recent Tube

Breaking

Friday, August 1, 2025

वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी




वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 



रणसंग्राम न्युज संपादक नितिन होवाळ मो नं 9112049614 



सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.


 लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मार्गदर्शन प्राध्यापक मधुकर गाडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, रणसंग्राम न्यूज चे संपादक नितीन होवाळ, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दिपक होवाळ यांनी केले.


 लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी वाकी गावचे सरपंच संजय इंगोले, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल कापसे, विकास सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन जगन्नाथ बुचडे, शिवसेनेचे नेते संतोष रोकडे, माजी उपसरपंच श्रीकांत जाधव,ऋषिकेश पाटील, देवेंद्र बुचडे, अजित बुचडे, अमित कांबळे, उद्धव शिंदे, अजित पाटील, सुभाष बुचडे, दत्ता कांबळे, सिताराम कांबळे, राहुल बुचडे, साहिल पवार, बाळासाहेब बुचडे, अतुल बुचडे, अमोल बुचडे, करण बुचडे, विठ्ठल कांबळे, शंकर होवाळ, सर्जेराव उबाळे, अमोल कांबळे, सुनील चव्हाण, प्रशांत गवळी, राहुल होवाळ, अजित होवाळ, संदीप गोतसूर्य, निलेश होवाळ, बबन गोतसूर्य, बाबासो चंदनशिवे,  धनाजी बुचडे, अजित कांबळे,मल्हारी बुचडेलोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,


लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत कार्यालय वाकी शिवणे येथे करण्यात आले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी शिवणे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुलांना वही पेन भेट वस्तू देऊन मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

No comments:

Post a Comment