वाकी शिवणे येथे स्वर्गीय माजी आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय माजी आमदार डॉ गणपतरावजी देशमुख यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त वाकी शिवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शुक्रवार दिनांक 2/ 8/ 2025 रोजी सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना वाकी शिवणे यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख व शेतकरी कामगार पक्षाचे माजी चिटणीस विठ्ठलराव शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
तरी या रक्तदान शिबिरामध्ये वाकी गावातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आव्हान पुरोगामी युवक संघटना व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केले आहे



No comments:
Post a Comment