Recent Tube

Breaking

Saturday, August 2, 2025

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ज्ञानविकास नाईट हायस्कुलमध्ये शैक्षणिक सहभागात सहकार्याचा हात




साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ज्ञानविकास नाईट हायस्कुलमध्ये शैक्षणिक सहभागात सहकार्याचा हात


आपल्या साहित्यातून जगामध्ये भारत देशाचे नाव गाजवणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 

घरच्या परिस्थितीतून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या होतकरू, मेहनती, श्रमिक वर्ग आणि गृहिणींना मोफत शाळेय शिक्षण देण्यापासून उत्कृष्ट करियर मिळवून देण्यापर्यंत कार्यरत असणारी, सलग इयत्ता आठवी ते दहावीचा शंभर टक्के रिझल्ट देणारी आणि मेरीट टक्केवारीत नाव टिकवून ठेवलेल्या मुंबई, सायन (पुर्व) मधील जोगळेकर वाडी म्युनिसिपल शाळा संकुलमधील सुप्रसिध्द पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचालित ज्ञानविकास नाईट हायस्कुल येथील वर्ष २०२५-२०२६ मधील रात्रशाळेमधील इयत्ता आठवी, नववी आणि दहावी नवोदित विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची अधिकाधिक गोडी वाढावी आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून सन्माननीय प्रिन्सिपल परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक चळवळीतील निस्वार्थी समाजसेवकांमार्फत




कार्यक्रमाच्या सुरवातीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मान्यवरांनी मानवंदना देऊन शिस्तीपुर्वक दैनंदिन प्रार्थना ज्यामध्ये मानवतेचा आणि समानतेचा संदेश देणारी सानेगुरुजींची खरा तो एकची धर्म आणि महाराष्ट्र राज्य गीताने प्रारंभ झाला.  वर्गशिक्षक सुर्यवंशी सर, विज्ञानतज्ञ पोकळे सर, गणिततज्ञ अजित नाईक सर ह्यांनी आपापल्या इयत्ता आठवी, नववी आणि दहावी विद्यार्थ्यांना पुर्व सुचना देत शिस्तबध्दता बाळगून रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक गोष्टी पुरवठा करून रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शैक्षणिक पाठबळ देण्यासाठी ह्या कार्यक्रमाचा आशय विद्यार्थ्यांना सांगितला गेला आणि मुख्याध्यापक सरांसह मान्यवरांच्या हस्ते रात्रशाळेतील प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थ्यास स्कूल बॅग वाटप करण्यात आले. 



शोषित, पीडित  समाजातील वर्गाला शिक्षण, रोजगार, उद्योग, अर्थक्रांती, सामाजिक बांधिलकी, अन्यायाविरुद्ध लढा आणि मानवतेच्या धर्मासाठी कटिबद्धता ह्या वचनांपैकी न्यायासाठी लढाई देत असताना समाजातील मुलभुत गरजानुसार सध्या शिक्षणावर भिमसैनिक संघटना प्रखरतेने कार्यरत आहे. ह्याच भिमसैनिक संघटनेच्या छावणी प्रमुख तसेच, घरेलू हिंसाचार निर्मूलन कार्यकर्त्या आणि समाजसेविका शबनम (आपा) शेख मॅडम यांनी स्वखर्चाने भीमसैनिक संघटना व शबनम शेख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या रात्रशाळेतील सर्व वर्गातील स्त्री पुरुषांना मुंबई, सायन (पुर्व) मधील सायन काळा किल्ला जवळील जोगळेकरवाडी म्युनिसिपल संकुलमधील ज्ञानविकास नाईट हायस्कुलमध्ये श्रेयवाद न स्विकारता, निस्वार्थी भावनेने १५० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करताना विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. 



ह्या प्रसंगी ज्ञानविकास नाईट हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे लाडके सन्माननीय मुख्याध्यापक भगवान परदेशी सर, माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी   जितेंद्र कांबळे गुरूजी यांच्यासह शबनम शेख फाऊंडेशनच्या अध्यक्षा शबनम (आपा) शेख मॅडम, भिमसैनिक संघटनाचे प्रतिनिधींसह मासूम संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर प्रतिनिधी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहून सहभागी झाले होते. 



ज्ञानविकास नाईट हायस्कुल मध्ये प्रवेश घेतलेल्यांपैकी काही परिवाराचा भार सांभाळणाऱ्या गृहिणी तर काही खाजगी नोकऱ्या करणारे व मनपामधील कर्मचारी तर काही कारखान्यामध्ये अंगमेहनतीचे काम करणारे मेहनत करणारे युवा तर काही परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडलेले तरुण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या इयत्ता आठवी, नववी आणि दहावी मधील होतकरू, मेहनती आणि श्रमिक वर्गामध्ये शिक्षणाची ऊर्जा निर्माण करून शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी सर्व परिस्थितीची कोणतीही सबब न देता रात्रशाळा सुरू झाल्यापासून नित्यनियमाने आवर्जुन उपस्थित राहिलेले विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची रोजची उपस्थितीत आजही दिसत होती.




हि आज वाढत्या महागाईच्या काळात अशक्य गोष्ट आणि त्याहून कठिण म्हणजे अनेक दिवसांचा शिक्षणात गॅप पडणाऱ्यांनी चांगल्या मार्काने पास होणे, ह्या असाध्य गोष्टी सातत्याने पाच वर्ष शंभर टक्के रिझल्ट देणारी, रॉल ऑफ मॉडेल बनलेली ज्ञानविकास नाईट हायस्कुल आणि आदरणीय मुख्याध्यापकसह शिक्षक वृंद यांचे परिश्रम आणि प्रसिध्दीची हाव न ठेवता शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहकार्य करणारे दानवीर समाजसेवक.



अशा वृत्तीमुळेच मराठी रात्रशाळा टिकतील अन्यथा एक शाळा, एक भाषा, एक संस्कृती मिटण्यास वेळ लागणार नाही. म्हणून परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहित करा आणि शक्य असल्यास यथाशक्तीप्रमाणे शालेय वस्तू, शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक दायित्व प्रत्येक नागरिकांनी भारतीय म्हणून करावे.

No comments:

Post a Comment