छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वाकी शिवणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त शिव प्रेमी तरुण मंडळ वाकी शिवणे यांच्या वतीने विविध कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक 19/2/2025 रोजी सयंकाळी 7 वाजता शाहीर विशाल इंदुलकर यांचे शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दिनांक 22/2/2025 रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत भव्य खुला गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा (छोटा ग्रुप)
रविवार दिनांक 23/2/2025 रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत भव्य खुला गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा (मोठा ग्रुप)
सोमवार दिनांक 24/2/2025 रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमास युवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शिवप्रेमी तरुण मंडळ वाकी शिवणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments:
Post a Comment