जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेत सांगोला महिला कबड्डी संघ विजेता व पुरुष कबड्डी संघ उपविजेता.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सोलापूर येथील नेहरू नगर मैदानावर पार पडलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी व पदाधिकारी क्रीडा स्पर्धेत सांगोला महिला कबड्डी संघाने सलग दुसर्या वर्षी विजेतेपद पटकाविले व पुरुष कबड्डी संघाला उपविजेतेपद मिळाले . महिला कबड्डी संघाची कर्णधार मनिषा कोकरे हिने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात मोहोळ संघाला धूळ चारली व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कारही मिळवला.कर्णधारास सुधामती गंगणे,सुलताना शेख,राखी सरवदे, वैशाली मोटे, अश्विनी माने,सुवर्णा उन्हाळे,भारती पाटील, लैला गायकवाड,शोभा ठोकळे,शितल लेंडवे, सविता माने या महिला खेळाडूंनी दमदार साथ दिली .
या संघाला संघ व्यवस्थापक जगन्नाथ टकले ,संघ प्रशिक्षक संतोष शर्मा,पर्यवेक्षिका सावित्री गडहिरे,जांबेनाळ यांनी मार्गदर्शन केले.
राजकुमार ताटे यांच्या नेतृत्वाखालील सांगोला पुरुष कबड्डी संघानेही दमदार खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला पण अंतिम सामन्यात पंढरपूर संघाच्या अप्रतिम खेळामुळे सांगोला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या दोन्ही संघांचे सांगोला गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी , गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले , आयसीडीएसचे सीडीपीओ अभिजीत मोलाणी,शिक्षण विस्तार अधिकारी अमोल भंडारी यांनी अभिनंदन केले.



No comments:
Post a Comment