हलदहिवडी येथील महादेव सातपुते यांचे वृद्धापकाळाने निधन..
सांगोला -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाचे सांगोला तालुका अध्यक्ष खंडू सातपुते यांचे वडील महादेव भगवान सातपुते वय 90 यांचे आज दिनांक 14 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता स्मशानभूमी हलदहिवडी तालुका सांगोला या ठिकाणी होणार आहे त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, नातवंडे, चार भाव, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा नामदार रामदास आठवले हे मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनाच्या कार्यक्रमात असताना देखील त्यांनी निधनाची बातमी कळताच फोनवरून सांत्वन केले तसेच रिपब्लिक पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनीही दूरध्वनी द्वारे फोन करून सांत्वन केले.



No comments:
Post a Comment