Recent Tube

Breaking

Sunday, January 12, 2025

जय मल्हार क्रांती संघटनेच्या राज्य सचिवपदी उमेश मंडले यांची निवड.



जय मल्हार क्रांती संघटनेच्या राज्य सचिवपदी उमेश मंडले यांची निवड.


 रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला ( सांगोला येथील निर्भिड पत्रकार व माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते उमेश ज्ञानु मंडले यांची नुकतीच जय मल्हार क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.सांगोला येथे पार पडलेल्या जय मल्हार क्रांती संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत(नाना)उमाजी शितोळे यांनी उमेश ज्ञानु मंडले यांना संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदावर अधिकृत नियुक्ती केल्याचे पत्र दिले.


आजवर संघटना वाढीसाठी केलेल्या कार्याची नोंद घेवून मंडले यांची संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे.


उमेश मंडले हे पत्रकारिता,सामाजिक कार्यात भरीव असे काम करीत असतात.यापूर्वीही त्यांनी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या हिताची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आणून त्याबाबत पाढपुरावा केलेला आहे.


जय मल्हार क्रांती संघटनेचे नूतन महाराष्ट्र राज्य सचिव पदावर निवड झाल्याबद्दल पत्रकार उमेश मंडले यांचे मित्र परिवार,राजकीय नेते,विविध सामाजिक संघटना यांचेकडून अभिनंदन केले जात असून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र ही बेरड,बेडर,रामोशी समाजा बरोबर बहुजन समाजाचे समस्या सोडवण्यासाठी स्थापन केलेली असून आजवर सामान्य जनतेच्या हितासाठी लढा दिला आहे.

No comments:

Post a Comment