उद्योजक दिपक शिनगारे यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरी येथे वृक्षारोपण व खाऊ वाटप.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य व मांजरी येथील उद्योजक दिपक शिनगारे यांनी मांजरी येथे १०१ झाडे लावून वृक्षारोपण करत तसेच जि. प. शाळेतील मुलांना खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.
आपुलकी प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य दिपक शिनगारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून १०१ झाडे लावण्याचा संकल्प केला होता, तो त्यांनी गुरुवारी पूर्ण केला. आपुलकी प्रतिष्ठानच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ५०० च्या वर झाडे लावून झाली आहेत. फक्त वृक्षारोपण न करता वृक्ष संगोपनाची जबाबदारीही वृक्षप्रेमींकडून घेतली जात आहे.
मांजरी येथे गुरुवारी झालेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, महादेव दिवटे, अरविंद केदार, अण्णासाहेब मदने, रमेश देवकर, अरविंद डोंबे, विकास देशपांडे, दादा खडतरे,अमर कुलकर्णी, सुनिल मारडे तसेच मांजरी येथील माजी सरपंच भाऊसाहेब जगताप, उत्तम पवार, बंडूपंत कुलकर्णी, सुशांत जाधव, प्रशांत जाधव, प्रशांत शिनगारे, ग्रामसेवक मंगेश पोरे, माजी सरपंच अमृत उबाळे, पत्रकार सचिन भुसे, वैभव इंगोले, अजित खडतरे, सुनील जगताप, माजी सरपंच जयवंत जगताप, राहुल शिनगारे, गणेश जाधव, दिनेश सोळगे, अमित तांबोळी, डेप्युटी तुकाराम शिनगारे, दगडू कोळी, रणजीत पवार, दिनेश जगताप, शितल घाडगे, दत्तात्रय शिनगारे, श्रीकांत शिनगारे, पोलीस पाटील किशोर जगताप, अशोक शिनगारे तसेच शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र जगताप, डिकोळे गुरुजी, मारुती वाकुरे, मच्छिंद्र फाटे,सुशांत जाधव, दत्तात्रय शिनगारे आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment