Recent Tube

Breaking

Thursday, June 20, 2024

अपघातामध्ये मृत पावलेल्या पाच महिलांना एकाच वेळी दिला अग्नी.



अपघातामध्ये मृत पावलेल्या पाच महिलांना एकाच वेळी दिला अग्नी.


महुद/प्रतिनिधी पंढरपूर-आटपाडी रोडवरील सातपुते वस्ती चिकमहुद येथे मंगळवारी झालेल्या अपघातामध्ये मृत झालेल्या ५ महिलांवर कटफळ गावामध्ये दि. १९ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील एका महिलेस त्यांचे सासरी पांढरेवाडी (ता. पंढरपूर) येथे अग्नी देण्यात आला. यावेळी मोठा जनसमुदाय शोकाकुळ वातावरणात उपस्थित होता.


सातपुते वस्ती महूद येथे मंगळवारी दुपारी ३.३० च्या दरम्यान ७ महिला वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. यावेळी पंढरपूरकडून आलेल्या भरधाव माल ट्रक क्र. एम. एच. ५०/एन. ४७५७ याचा चालक सुरज रामचंद्र वीर याने रोडचे परिस्थितीकडे न पाहता वाहन चालवीत सदर महिलांना अक्षरशः चिरडले यामध्ये इंदुबाई इरकर वय (५०), अश्विनी सोनार (३३), सुलक्षणा भोसले (४५)

कमल बंडगर (४०), सिरमाबाई जाधव (४५), मनीषा आदिनाथ सोनार (३५ रा. सर्व कटफळ) या सहा महिला मृत पावल्या होत्या तर मिताबई दत्तात्रय बंडगर (वय ५०) ही महिला जखमी असल्याने त्यांचे उपचार सुरू आहेत. वरील मृत शेतमजूर महिलांपैकी क्रमाने ५ महिलांना कटफळ गावामधे बुधवार दि. १९ रोजी एकाच वेळी अग्नी देण्यात आला तर सिरमाबाई

लक्ष्मण जाधव यांना त्यांचेवर सासरी पांढरेवाडी (ता. पंढरपूर)येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चौकट -

1)मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत


आमदार शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त करीत शासकीय योजनेतून मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आ. पाटील यांनी घटना समजताच प्रत्येकी मृत महिलेच्या नातेवाईकांना ५० हजाराची मदत जाहीर केली. तहसीलदार संतोष कणसे यांनी शासनाकडून मदत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी वाहन मालकाने देखील घटनेचे व्यक्त करीत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करणार सांगितले असल्याचे उपस्थितांनी सांगितले.


2)ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात


ट्रकचा चालक सुरज रामचंद्र वीर यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो जखमी असल्याने त्याचेवर उपचार चालू असल्याचे तपास अधिकारी ए.पी.आय. मोरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment