ओबीसी समाज बांधवाकडून आज सांगोला बंदची हाक.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील ओबीसी समाजाकडून आज सांगोला बंदची हाक देण्यात आली असून सकाळी 11 वाजता अनकढाळ टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगोला बंद व रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. सांगोला बंद व रास्ता रोको आंदोलन बाबत गुरुवार दिनांक 20 जून रोजी सांगोला तालुक्यातील ओबीसी समाजाकडून तहसीलदार सांगोला व पोलीस निरीक्षक सांगोला यांना निवेदन देण्यात आले आहे.
ओबीसी उपोषणाच्या मागणीचा शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा शासनाने दखल न घेतल्यास ओबीसी समाजाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देताना पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख, डॉ प्रभाकर माळी, शिवाजीराव बनकर, बाळासाहेब एरंडे, मारुती आबा बनकर, आनंदा माने, उल्हास धायगुडे, भैरवनाथ बुरांडे, प्रशांत वलेकर, नारायण पाटील, सचिन होनमाने, सागर होनमाने, जीवन शेळके, दत्तात्रय नरळे, प्रवीण हजारे, संतोष करांडे, भारत वसेकर, दत्तात्रय जानकर, सूर्यकांत आधाटे, चंद्रकांत बंडगर, दर्याबा बंडगर, महादेव बुरुंगले, डॉ संतोष लवटे, आनंदराव मेटकरी, ओंकार बंडगर, तानाजी खंडागळे, महेश बनकर, रमेश बनकर, शुभम बनकर, सुहास कोकरे, शंकर चोरमुले, शिवाजी वाकडे, विजय वाकडे, दीपक होनमाने, विकास श्रीराम, राहुल होनमाने, संतोष टकले, विशाल गोडसे, सोमनाथ आदलिंगे, संभाजी बनसोडे, सहदेव पारेकर, सुभाष कोकरे, यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.


No comments:
Post a Comment