युवकांचे हृदयसम्राट मा नवनाथ (दादा) पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील युवकांचे हृदयसम्राट मा नवनाथ (दादा ) पाटील यांच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 15/ 6/ 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अजिंक्यतारा हॉटेल शाखा नंबर 2 गायगव्हाण फाटा पंढरपूर रोड येथे आयोजित केले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबिरामध्ये नवनाथ (दादा) पाटील मित्र परिवाराच्या वतीने व त्यांच्या वरती जीवापाड प्रेम करणाऱ्या युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान केले.
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते नवनाथ (दादा) पाटील यांचा फेटा, शाल, पुष्पहार घालून व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
व त्यांना त्यांच्या सामाजिक, राजकीय, औद्योगिक वाटचालीस डॉ बाबासाहेब देशमुख यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नवनाथ (दादा) पाटील यांच्या वरती प्रेम करणारा युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. नवनाथ (दादा) पाटील यांना प्रत्यक्षात भेटून व व्हाट्सअप, फेसबुक वरती तसेच फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा नेते मंडळींनी व त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या युवकांनी दिल्या.


No comments:
Post a Comment