सांगोला तालुक्यातील खांडेकरवाडी शाळेमध्ये निरोप समारंभ संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील खांडेकरवाडी नवी शाळेमध्ये इयत्ता चौथी निरोप समारंभ व गुढीपाडवा, पट वाढवा उपक्रमाअंतर्गत पहिली प्रवेश पात्र विद्यार्थी यांच्या प्रवेश देण्यात आला.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक व शाळेविषयी भावनिक होऊन आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी वर्गणी जमा करून शाळेला घड्याळ व जिजामातेचा फोटो भेट दिला.
यावेळी "गुढीपाडवा पट वाढवा "या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली प्रवेश पात्र 10 विद्यार्थ्यापैकी सात मुलांना प्रवेश देण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शाळा परिसरातील सर्व पालक,SMCसदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री कांबळे सर व वर्गशिक्षिका राणी वेळेकर मॅडम यांनी परीश्रम घेतले.


No comments:
Post a Comment