लहुजी शक्ती सेनेच्या तालुकाध्यक्षपदी आप्पासाहेब वाघमारे यांची निवड.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील चिकमहूद गावचे सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब वाघमारे यांच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय कार्याची दखल घेऊन लहुजी शक्ती सेनेच्या तालुकाध्यक्षपदी आप्पासाहेब वाघमारे यांची दिनांक 10/4/2024 रोजी 1 वाजता सोलापूर येथे निवड करण्यात आली.
लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले यांच्या शुभहस्ते आप्पासाहेब वाघमारे यांना तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष वसंत बेढे, पश्चिम महाराष्ट्र कोर कमिटी अध्यक्ष सुधाकरभाऊ पाटोळे व लहुजी शक्ती सेनेचे जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
लहुजी शक्ती सेनेच्या तालुकाध्यक्षपदी आप्पासाहेब वाघमारे यांची निवड झाल्याची समजता चिकमहुद गावात फटाक्याची आताषबाजी करण्यात आली व तालुक्यातून आप्पासाहेब वाघमारे यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.



No comments:
Post a Comment