पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी अमोल बाबर यांच्या घरी दिली भेट.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील महूद बु गावचे सामाजिक कार्यकर्ते अमोल बाबर यांचे बंधू प्राध्यापक अतुल बाबर यांचा मंगल परिणय सोहळा श्रीयश पॅलेस पंढरपूर येथे बुधवार दिनांक 28/ 2/ 2024 रोजी संपन्न झाला.
परंतु या मंगल परिणय सोहळ्यास काही कारणास्तव पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख हे उपस्थित राहू शकले नाहीत.
म्हणून डॉ बाबासाहेब देशमुख यांनी शुक्रवार दिनांक 1/3/ 2024 रोजी दुपारी 2 वाजता महूद येथे बाबर यांच्या घरी जाऊन नव दांपत्यास त्यांच्या वैवाहिक जीवनास शुभेच्छा दिल्या.
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांचा बाबर कुटुंबीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जि.प.सदस्य उध्दव सरतापे, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते विजय सरतापे, शेकापचे प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे, अंकुश येडगे , बाळासाहेब ढाळे,भागवत सरतापे बापु केसकर, नवा सरतापे,देवीदास गोफणे,मारुती सरतापे बाळासाहेब सरतापे, सुहास चंदनशिवे, डॉ स्वप्नील सरतापे मोहन सरतापे, विक्रम सरतापे, विक्रम मधुकर सरतापे, कल्याण येडगे, आदर्श सरतापे,निखील सरतापे,भैया बाबर , विक्रांत सरतापे,गौरव सरतापे इत्यादी उपस्थित होते



No comments:
Post a Comment