Recent Tube

Breaking

Saturday, March 2, 2024

चोपडी येथील सोनाली भारत बाबर यांची सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग- 2 पदावर निवड.



चोपडी येथील सोनाली भारत बाबर यांची  सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग- 2 पदावर निवड.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला/ प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील चोपडी येथील कुमारी सोनाली भारत बाबर यांची सार्वजनिक बांधकाम विभाग वर्ग- 2 अराजपत्रित पदावरती 26 जानेवारी 2024 रोजी सरळ सेवा भरतीतून निवड झाली आहे. सोनाली बाबर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण बाळासाहेब देसाई विद्यालय चोपडी येथे झाले. विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण आटपाडी येथे झाले .तर बी.एससी पदवीचे शिक्षण पुणे येथे झाले .महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत जलसंपदा विभाग सहाय्यक अभियंता वर्ग -2 राजपत्रीत या पदावर 28 फेब्रुवारी 2024 रोजी निवड झाली आहे . 

कुमारी सोनाली बाबर या हुशार व जिद्दी असल्याने  शासनाच्या जलसंपदा विभागात व सार्वजनिक बांधकाम विभागात निवड झाली आहे .सोनाली बाबर  यांचे आई -वडील शेती व  किराणा मालाचे दुकान चालवतात . सोनाली बाबर यांनी जिद्द व उच्च ध्येय समोर ठेवून ही दोन्ही पदे प्राप्त केली आहेत. त्याबद्दल सोनाली बाबर  यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.   अनेकांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment