Recent Tube

Breaking

Sunday, January 28, 2024

आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने शिरभावी येथील होवाळ कुटुंबास शेळी भेट.



आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने शिरभावी येथील होवाळ कुटुंबास शेळी भेट.


 

रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला ( प्रतिनिधी )- कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अडचणीत आलेल्या शिरभावी येथील होवाळ कुटुंबियांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने शेळी भेट देण्यात आली.

            शिरभावी येथील सरूबाई महादेव होवाळ या आपल्या तरुण मुलाच्या आकस्मिक निधनानंतर गेल्या १० महिन्यांपासून आपल्या दोन लहान नातवांचा प्रतिकूल परिस्थितीत सांभाळ करत असल्याची माहिती आपुलकी प्रतिष्ठानला मिळाल्यानंतर आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने या होवाळ कुटुंबीयांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून रविवारी दोन पिलांची शेळी भेट देण्यात आली. 

त्याचबरोबर अमेरिकेत वास्तव्यास असलेले आपुलकी सदस्य डॉ. राजाराम ढोले यांच्याकडून होवाळ कुटुंबातील या लहान बहिण भावांना कपडे भेट देण्यात आले.

यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, प्रभाकर सरगर, महादेव दिवटे, अरविंद केदार, काशिलिंग सरगर, अरविंद डोंबे गुरुजी, प्रसन्न कदम आदीसह सखुबाई वाघमारे, गोरख लेंडवे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment