देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास - चेतनसिंह केदार सावंत.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
नऊ वर्ष अविरत पंतप्रधानाची धुरा सांभाळत देशाला पंतप्रधान मोदींनी आग्रहाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. देशातील मतदारांचा हा ट्रेड येणाऱ्या लोकसभेत ही कायम असेल.नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशात चांगले काम करत असल्याने देशातील जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर विश्वास दाखवेल असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जानेवारी रोजी मतदार दिनानिमित्त देशामध्ये पाच हजार ठिकाणी नवमतदारांशी संवाद साधला.हा कार्यक्रम सांगोला महाविद्यालय व दीपक आबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेज महाविद्यालय कोळे येथे दोन ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. येथील कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, दुर्योधन हिप्परकर, विलास होनमाने, अमोल साखरे, शिवाजी आलदर, मोहन बजबळे, अजित लवटे, विष्णू सरगर, अमोल मोहिते, दीपक माने यांच्यासह नव मतदार उपस्थित होते.
चेतनसिंह केदार सावंत म्हणाले देशात राबविण्यात येत असलेल्या विकासात्मक योजना व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचा वाढत असलेला प्रभाव याचे आकलन निश्चित जनता करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक महिला शेतकरी आणि गरीबी या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाचा आलेख उंचावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाचा पताका डौलाने फडकू लागला आहे. असा दावा केदार सावंत यांनी केला आहे. मोदींनी आत्मनिर्मर व
जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. मागील साडेनऊ वर्षात देशासाठी अनेक निर्णय घेतले. त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना राबविल्या गरीब जनतेसाठी अन्नसुरक्षा योजना राबविली आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरी देशातील जनतेला नरेंद्र मोदी हवे आहेत भाजपने देशाचा काया पलट करून दाखविला आहे असेही चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले आहे.


No comments:
Post a Comment