भाजपा सांगोला तालुका अध्यक्षपदी अतुल पवार, दुर्योधन हिप्परकर यांची निवड.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील भाजपा पक्षाचे संघटन करण्याच्या दृष्टीने प्रथमच सांगोला तालुक्याला दोन अध्यक्ष मिळाले आहेत.तसे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी नूतन तालुकाध्यक्षांना दिले आहे.
सांगोला उत्तरच्या तालुकाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार तर दक्षिणच्या तालुकाध्यक्षपदी दुर्योधन हिप्परकर यांची भाजपाने निवड केली आहे.जिल्हा परिषद गटनिहाय या निवडी केल्यामुळे भाजपाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी नूतन तालुकाध्यक्षच्या निवडी केल्या नूतन तालुका अध्यक्षांच्या समर्थकांनी गुलाबाची उधळण करीत फटाक्याची जोरात आताष बाजी केली. येणाऱ्या काळात भाजपाची ध्येय धोरणे, बुथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्षांनी सांगितले.


No comments:
Post a Comment