मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना वाकी शिवणे गावात प्रवेश बंदी.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी अनेक प्रकारचे आंदोलने सुरू असताना.
त्याचाच एक भाग म्हणून सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दिनांक 30/ 10/ 2023 रोजी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाकी शिवणे गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
व तसेच साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment