Recent Tube

Breaking

Sunday, October 29, 2023

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नवनाथ पाटील यांनी उपसरपंच पदाचा दिला राजीनामा.



मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नवनाथ पाटील यांनी उपसरपंच पदाचा दिला राजीनामा.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 911204964



सांगोला तालुक्यातील गायगव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच नवनाथ पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रात विविध प्रकारचे आंदोलने सुरू असताना. त्याचाच एक भाग म्हणून नवनाथ पाटील यांनी उपसरपंच व सदस्य पदाचा राजीनामा गायगव्हाण ग्रामपंचायतचे सरपंच सौ अनिता बाळासाहेब कांबळे यांच्याकडे दिला आहे.

नवनाथ पाटील यांच्या राजीनाम्यामुळे सांगोला तालुक्यामध्ये त्यांची नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी आपल्या सर्व पदाचे राजीनामे दिल्यामुळे मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिक व युवकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

व सांगोला तालुक्यामध्ये या त्यांच्या राजीनामामुळे सर्वत्र चर्चा नवनाथ पाटील यांच्या नावाची सुरू आहे.

No comments:

Post a Comment