मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी वाकी शिवणे येथे धरणे आंदोलनास सुरुवात.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषण धरणे आंदोलन व राजकीय नेत्यांना गाव बंदीचे आयोजन करण्यात आले आहे.
याचाच एक भाग म्हणून वाकी शिवणे गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन व साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
व तसेच सर्वपक्षीय नेत्यांना गाव प्रवेश बंदीचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनात विविध मान्यवरांनी मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मनोगत व्यक्त केले आहेत. व तसेच अनेक लोकांनी या आंदोलनास पाठिंबा देऊन मनोगत व्यक्त करण्यात आले आहे. या आंदोलनास पत्रकार नितीन होवाळ यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला.
या आंदोलनामध्ये ज्ञानेश्वर पाटील ,हर्षल शिंदे, साहेबराव पाटील, मच्छिंद्र जाधव, तुकाराम जाधव, सोनु पवार, महेश लिगाडे,प्रवीण मोहिते,अनिल कापसे,अनिल पाटील,रोहित जाधव,ऋषी पाटील,संतोष रोकडे,संजय पाटील, सुधाकर जाधव,उद्धव शिंदे, उध्दव पाटील,अमोल पाटील,संजय बाबर,राम बाबर,सुदर्शन जुगदर,तानाजी जुगदर,रामभाऊ जाधव,महादेव पाटील,बबन घाडगे,वसंत दणके,दासाब दणके,जना दणके,मारुती ढोले.दत्ता जाधव,भारत रोकडे दादासो पाटील,अंबादास जाधव,नितीन पाटील. व मराठा समाजाचे ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनात सहभागी झाले आहेत.


No comments:
Post a Comment