Recent Tube

Breaking

Monday, October 16, 2023

सांगोल्यात आज खा.रणजितसिंह निंबाळकरांचा जनता दरबार – चेतनसिंह केदार सावंत.



सांगोल्यात आज खा.रणजितसिंह निंबाळकरांचा जनता दरबार चेतनसिंह केदार सावंत. 



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला (तालुका प्रतिनिधी) मतदारसंघातील पाणी प्रश्न, विकासकामे, शासकीय कार्यालयातील प्रलंबित कामे यासह नागरिक, शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी आज सांगोल्यात वाढेगाव नाका येथील ज्योतिर्लिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी खा.रणजितसिंह निंबाळकरांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. यावेळी ते शेतकरी, नागरिक यांच्याशी यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

       माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे आज मंगळवार १७ ऑक्टोंबर रोजी सांगोला तालुक्याच्या येणार आहेत. सांगोल्यात वाढेगाव नाका येथील ज्योतिर्लिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी खा.रणजितसिंह निंबाळकरांचा जनता दरबार आयोजित केला आहे. यावेळी खासदार निंबाळकर हे सांगोला तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, नगरपालिका, पंचायत समिती, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, सामाजिक वनीकरण, वनविभाग, पशूसंवर्धन विभाग या शासकीय कार्यालयातील जनतेच्या अडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने जनता दरबाराचे आयोजन केले आहे.

तसेच यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे शेतकरी, नागरिक यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

No comments:

Post a Comment