Recent Tube

Breaking

Saturday, October 14, 2023

न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला येथे मेरी माटी मेरा देश'उपक्रम उत्साहात संपन्न.



न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला येथे मेरी माटी मेरा देश'उपक्रम उत्साहात संपन्न.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित न्यू इंग्लिश स्कूल जूनि कॉलेज सांगोला येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 'मेरी माटी मेरा देश 'हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी सुरुवातीला संस्था सदस्य प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या मनोगतातून मानवी जीवनासाठी हवा ,पाणी ,अन्न हे जसे आवश्यक घटक आहे.

तसेच माती हा देखील महत्वपूर्ण घटक आहे कारण मानवी जीवन स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी रसायनमुक्त अन्नधान्याची गरज आहे. त्यासाठी सेंद्रियखतांद्वारे आपण मातीची सुपिकता टिकून ठेवू शकतो व अन्नधान्याचे उत्पन्न वाढवू शकतो. मातीचे विघटन नैसर्गिक पद्धतीने कसे होते व ते मानव व प्राणीमात्रांसाठी उपयोगी कसे आहे तसेच मानवी हस्तक्षेपामुळे मातीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना सांगून मातीचे महत्त्व स्पष्ट केले.

यानंतर प्राचार्य आदलिंगे सर यांनी माती आपल्याला जगवते त्यामुळे मातीशी आपले घट्ट नाते असावे. तसेच देशाप्रति इमान राखून राष्ट्रप्रेम जागृत ठेवून माती व देश या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी असे सांगितले. यावेळी इंग्लिश स्कूल जुनि.कॉलेजचे उपप्राचार्य माने सर, पर्यवेक्षक शिंगाडे सर सहशिक्षक राऊत सर ,टकले सर ,इंगळे सर ,जाधव सर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.



 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी प्रा. संतोष राजगुरू व एन.एस.एस स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सौ. जुलेखा मुलांनी यांनी केले.

No comments:

Post a Comment