संजय गळवे आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालयातील विज्ञान शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच सातारा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार श्री संजय गळवे यांना देण्यात आला.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी सचिव विकास देशमुख संघटक डॉ अनिल पाटील माध्य सहसचिव बंडू पवार विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री संजय गळवे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखा मध्ये गेल्या सोळा वर्षापासून विज्ञान शिक्षक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
विविध प्रकारच्या बाह्य परीक्षा( NMMS. RTS. स्कॉलरशिप कर्मवीर विद्या प्रबोधिनी ), विज्ञान प्रदर्शन, रयत विज्ञान परिषद, शेती विषयक फाली उपक्रम, शिक्षण संक्रमण लेखन, रयत विज्ञान पत्रिका लेखन, शोधनिबंध इत्यादी गोष्टीमध्ये संजय गळवे यांनी भारिव योगदान दिले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय सारोळा, तालूका कासारा, जिल्हा अहमदनगर या विद्यालयात राबविलेला वाचन कोपरा हा उपक्रम अतिशय उल्लेखनीय बाब आहे. संजय गळवे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे नरळेवाडी पोलीस पाटील नानासाहेब वाळखिंडे, जालिंदर गळवे, धनंजय नरळे सर, बाळासाहेब गळवे, शरद गळवे, माजी उपसरपंच महादेव वाळखिंडे, महादेव गळवे, दादासाहेब गळवे, चेअरमन तानाजी नरळे, दादासाहेब ढेंबरे, धनंजय वाळखिंडे, दादासाहेब खिल्लारे, विकास वाळखिंडे, वसंत ढेंबरे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.


No comments:
Post a Comment