Recent Tube

Breaking

Monday, September 11, 2023

महूद गावचे मारुतीराव येडगे महाराष्ट्राचे अनमोल रत्न या पुरस्काराने सन्मानित.



महूद गावचे मारुतीराव येडगे महाराष्ट्राचे अनमोल रत्न या पुरस्काराने सन्मानित.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


महूद गावचे सुपुत्र व मायभूमी रीलिटी ग्रुप पुणे यांचे सीईओ मारुतीराव दिगंबर येडगे यांना महाराष्ट्राचे अनमोल रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार राज्याचे उद्योग मंत्री मा उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. 

लँड डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. यासाठी त्यांना एबीपी माझा या वृत्तवाहिनी कडून पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन उद्योग व्यवसायामध्ये उंच भरारी घेणाऱ्या मारुतीराव येडगे यांनी हा पुरस्कार प्राप्त करून सांगोला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सांगोला तालुका व महूद परिसरातील नागरिकांमधून त्यांच्यावर अभिनंदनचा व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

No comments:

Post a Comment