महूद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या वतीने मोफत मूत्ररोग निदान व शस्त्रक्रिया उपचार.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील महूद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड ICU व सोनोग्राफी सेंटरच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना यांच्या माध्यमातून मोफत मूत्ररोग निदान मोफत शस्त्रक्रिया उपचाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपचारासाठी सुप्रसिद्ध डॉ तन्मय मेहता (एम. बी. बी. एस. एम एस) हे उपस्थित राहून या शिबिरामध्ये रुग्णांवरती उपचार करणार आहेत. यामध्ये मूत्ररोग, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार, किडनीचे आजार, किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे, मूत्राशयातील खडे, अन्य मूत्र विकार या सर्व आजारावर मोफत निदान मोफत तपासणी व सोनोग्राफी, एक्स-रे, मूत्रविकार या संबंधित सर्व रक्त, लघवी तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. तरी गोरगरीब व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान महूद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड ICU व सोनोग्राफी सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment