Recent Tube

Breaking

Monday, September 11, 2023

पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते वैभव काटे यांचा सत्कार संपन्न.



पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते वैभव काटे यांचा सत्कार संपन्न.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करणारे तसेच गोरगरीब, शेत मजुरांच्या व शेतकऱ्यांच्या व्यथा लेखणी द्वारे शासन दरबारी मांडणारे चिकमहूद गावचे सुपुत्र, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पत्रकार वैभव काटे यांचा वाढदिवसानिमित्त शाल,श्रीफळ देऊन फेटा बांधून सन्मान करण्यात आला. व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी समाज बांधव व नागरिक उपस्थित होते.वैभव काटे हे एक प्रमाणिक पत्रकार असुन ते सतत अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याच काम सातत्याने करत आहेत.त्यांचा दांडगा संपर्क पाहता त्यांचे मित्र,हितचिंतक खुप मोठ्या प्रमाणात आहेत.आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना मोठया प्रमाणात सोशल मिडीयावरून,शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment