Recent Tube

Breaking

Sunday, September 3, 2023

मराठा आंदोलकावर लाठीचार्ज झाल्याच्या निषेधार्थ वाकी शिवणे गाव बंद.



मराठा आंदोलकावर लाठीचार्ज झाल्याच्या निषेधार्थ वाकी शिवणे गाव बंद.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरावरी या गावात मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन शांतता मार्गाने आंदोलक आंदोलन करीत होते. 

या आंदोलनकावर पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केल्याने यामध्ये मराठा समाजातील महिला, लहान मुले व तसेच युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्याच निषेधार्थ सकल मराठा समाज वाकी शिवणे यांच्या वतीने वाकी शिवणे गाव सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवून या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. वाकी शिवणे गाव बंद आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले. यावेळी गावातील सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून या आंदोलनास उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

यावेळी ऋषिकेश पाटील, हर्षल शिंदे, दीपक होवाळ, मारुती ढोले, अनिल कापसे, अनिल पाटील, संतोष गाडेकर, ज्ञानेश्वर उबाळे, ज्ञानेश्वर पाटील, सुभाष जुगदर, राजेंद्र हंबीराव, श्रीमंत सोनलकर, विजय सिद, पोलिस पाटील लहू मेटकरी, समाधान होवाळ व असंख्य मराठा बांधव या वेळी उपस्थित होते. तसेच या गावबंद आंदोलनाचे निवेदन मंडल अधिकारी श्री उगले यांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment