Recent Tube

Breaking

Saturday, September 2, 2023

सांगोला पोलीस स्टेशन व एस टी बस डेपो सांगोला या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा.



सांगोला पोलीस स्टेशन व एस टी बस डेपो सांगोला या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला या शैक्षणिक संकुला मधील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत एस टी महामंडळ सांगोला व सांगोला पोलीस स्टेशन या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यामध्ये सुरुवातीला एस टी महामंडळामध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना प्रकल्प अधिकारी प्रा. श्री. संतोष राजगुरू यांनी एस टी महामंडळाकडून मुलींना मिळत असलेल्या सवलती तसेच सुरक्षितता त्यांच्या या सहकार्याची जाणीव ठेवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेत आहोत असे सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली. 


यावेळी डेपो मॅनेजर नदाफ साहेब, सहाय्यक वाहतूक निरीक्षक काशीद साहेब, वाहतूक नियंत्रक बळवंत जाधव साहेब, सुरक्षारक्षक गायकवाड तसेच इतर एसटी कर्मचाऱ्यांना राखी बांधून हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी डेपो मॅनेजर नदाफ साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो निश्चितपणे कोणतीही अडचण न येता कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता तुम्हाला पूर्णपणे सहकार्याची भूमिका नेहमी राहील या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमअधिकारी प्रा. सौ. कामिनी वाघमारे यांनी मानले.


यानंतर सांगोला पोलीस स्टेशन सांगोला येथे पोलीस निरीक्षक मा. श्री. अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. मोरे, पोलीस उपनिरीक्षक उबाळे मॅडम व इतर पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रकल्प अधिकारी प्रा. श्री. संतोष राजगुरू यांनी रक्षाबंधनाचा पूर्व इतिहास थोडक्यात सांगून या कार्यक्रमाला सुरुवात केली. 



यावेळी पोलीस निरीक्षक मा. श्री. अनंत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले की महिलांना सुरक्षितता देण्यासाठी त्यांच्यावरील अन्याय रोखण्यासाठी आम्ही फक्त आजचा दिवस नव्हे तर वर्षातले 365 दिवस कायम तत्पर असतो परंतु हे करत असताना यामध्ये तुमच्या दक्षतेची सहकार्याची आम्हाला अपेक्षा असते तुम्ही आपले ध्येय गाठण्यासाठी शिक्षण घेत असताना कोणत्याही चुकीच्या प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिकपणे कष्ट करूनच यश मिळवले पाहिजे. 


कायदा व सुव्यवस्था तुमच्या हितासाठीच आहे त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे तसेच तुमचा आमच्यावरील विश्वास कायम राखणे चांगल्याचे रक्षण करणे ,वाईटाचा अंत करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. सौ. जुलेखा मुलानी यांनी मानले या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री. आदलिंगे सर, उपप्राचार्य श्री. माने सर, पर्यवेक्षक श्री. शिंगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी प्रा. श्री. संतोष राजगुरू, कार्यक्रमाधिकारी प्रा. सौ. सुनीता लिगाडे, प्रा.सौ. जुलेखा मुलांनी, प्रा. सौ. कामिनी वाघमारे, प्रा. सौ. सुवर्णा काशीद तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment