Recent Tube

Breaking

Wednesday, September 6, 2023

लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा सांगोला विधानसभा युवक काँग्रेसची मागणी.



लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा सांगोला विधानसभा युवक काँग्रेसची मागणी.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सागोला विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने जालना जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या वर अमानुषपणे झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामाच्या मागणी संदर्भात तहसिल प्रशासनास  मा.प्रा. सुनील भोरे सर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

मराठा समाजबांधव आरक्षण मागत होता, भिक नाही , हक्क मागत असुन झालेले कृत्य अतिशय निंदनीय आहे असे जिल्हा सरचिटणीस मा. प्रा. सुनिल भोरे सर यांनी सांगितले.ही घटना अत्यंत संतापजनक, खेदजनक  आणि निंदनीय आहे . याला जबाबदार कोण ? राज्यसरकारने उत्तर द्यावे  अशी मागणी अजयसिंह इंगवले यांनी केली.

रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब केल्याशिवाय आता शांत  बसणार नाही.कोपर्डीच्या भगिनीला न्याय द्यावा. आरक्षणाची घोषणा लवकरात लवकर करावी. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून ग्रहमंत्र्यांनी तक्ताळ राजीनामा द्यावा अशी मागणी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अजितदादा चव्हाण यांनी केली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस मा. प्रा . सुनिल भोरे सर , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे  सचिव अजयसिंह इंगवले, सांगोला विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अजितदादा चव्हाण, शहर युवक अध्यक्ष फिरोज मणेरी , युवा नेते रणजित महापुरे ,नागेश जाधव , अमन तांबोळी आदी  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment