Recent Tube

Breaking

Wednesday, September 20, 2023

अंकिता खंडागळे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.



अंकिता खंडागळे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.


आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन हो‌वाळ मो नं 9112049614


सांगोला ( प्रतिनिधी )- अंकिता खंडागळे हिची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी तिचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

डोंगरगाव ता.सांगोला येथील रहिवासी व न्यू इंग्लिश स्कुल सांगोला येथे ११ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेली कु.अंकिता दत्तात्रय खंडागळे हिने रांची येथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ६५ किलो वजनी गटांमध्ये व १७ वर्षे वयोगटांमध्ये देशपातळीवर तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल व पुणे  (बालेवाडी) येथे होणाऱ्या भारत सरकारच्या खेलो इंडिया वुमन्स लीग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल तिचा व पालकांचा आपुलकी प्रतिष्ठान च्या वतीने तिच्या घरी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, रमेशअण्णा देशपांडे, हरिभाऊ जगताप, प्रा. विधिन कांबळे सर, बाळासाहेब नकाते, अरविंद केदार, मार्केट कमिटी संचालक तथा आपुलकी सदस्य राम बाबर, डॉ. अनिल कांबळे, जितेंद्र बोत्रे गुरुजी, रविंद्र कदम, बाळकृष्ण चांडोले,अंकिताचे वडील दत्तात्रय खंडागळे, खंडागळे कुटुंबीय व डोंगरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment