राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी नवनाथ पाटील यांची निवड.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील गायगव्हाण गावचे उद्योजक नवनाथ पाटील यांची शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.
या निवडीनंतर नवनाथ पाटील यांनी सांगोला तालुक्यात लवकरच गावोगावी दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा विचारविनिमय करून 10 ऑक्टोबर पर्यंत सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकारणीची निवड करणार आहे.
राष्ट्रवादीचे खा शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment