Recent Tube

Breaking

Wednesday, September 20, 2023

आपुलकी प्रतिष्ठान कडून डोंगरगाव येथील जळीतग्रस्त पाटील कुटुंबियांना मदत.



आपुलकी प्रतिष्ठान कडून डोंगरगाव येथील जळीतग्रस्त पाटील कुटुंबियांना मदत. 



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला (प्रतिनिधी )- डोंगरगाव येथील जळीतग्रस्त पाटील कुटुंबियांना आपुलकी प्रतिष्ठान कडून संसारोपयोगी साहित्य व किराणा मालाची मदत करून आपुलकी जपली.

           रमेश महादेव पाटील रा.डोंगरगाव यांच्या राहत्या झोपडीला सोमवारी दुपारी अचानक आग लागली व क्षणार्धात संपूर्ण साहित्य व धान्याचा कोळसा झाला आणि पाटील यांचा प्रपंच उघड्यावर आला. याबाबत आपुलकी सदस्य सुरेशकाका चौगुले यांनी माहिती दिल्यानंतर तातडीने आपुलकी सदस्यांनी संसार उपयोगी साहित्य, कपडे व किराणा माल देण्याचे नियोजन करून बुधवारी सायंकाळी डोंगरगाव येथे जाऊन या कुटुंबाला आपुलकीची मदत देऊन सहकार्य केले.

         यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, रमेशअण्णा देशपांडे, हरिभाऊ जगताप, प्रा. विधिन कांबळे सर, बाळासाहेब नकाते, अरविंद केदार, मार्केट कमिटी संचालक तथा आपुलकी सदस्य राम बाबर, डॉ. अनिल कांबळे, जितेंद्र बोत्रे गुरुजी, रविंद्र कदम, बाळकृष्ण चांडोले आदीसह डोंगरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment