Recent Tube

Breaking

Saturday, September 30, 2023

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ निर्मितीसाठी सहकार्य करू- आ. शहाजी बापू पाटील.



वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ निर्मितीसाठी सहकार्य करू- आ. शहाजी बापू पाटील.


वृत्तपत्र विक्रेत्यांचे वेदांत हॉस्पिटलमध्ये सर्व रोग निदान शिबिर संपन्न. 


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


        संपादक पत्रकार व वाचक यांचा वृत्तपत्र विक्रेता हा दुवा असून पेपरला आलेली बातमी वाचकापर्यंत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र एजंट करतात परंतु याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते व ते वंचित राहतात तर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून कोरोना काळात एजंट यांचे फार मोठे योगदान आहे यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा असे सांगू व यासाठी आवाज उठवू असे मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी वृत्तपत्र विक्रेता सांगोला शहर व ग्रामीण यांच्यासाठी वेदांत हॉस्पिटल सांगोला येथे भरविण्यात आलेल्या रोगनिदान शिबिरात व्यक्त केले सुरुवातीस धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले


        ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेता आपली सेवा चोख बजावत असून त्यांनी कोरोना काळात ही फार मोठी योगदान दिले त्यांची दखल घेऊन वेदांत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तर्फे पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केले परंतु वृत्तपत्र विक्रेत्यांकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे तरी त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ शासनाने स्थापन करावे अशी मागणी यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष रविराज शेटे यांनी केली तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान मोठे व संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी शिबिर आयोजित करून आरोग्याची सर्वांची काळजी घेतली असे मत दत्तात्रय पवार यांनी व्यक्त केले .


यावेळी आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा अध्यक्ष रविराज शेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांचा सत्कार संघटनेचे खजिनदार उत्तम काका चौगुले यांच्या हस्ते तर सतीश भाऊ सावंत यांचा सत्कार संघटनेचे उपाध्यक्ष अमोल बोत्रे व डॉ. परेश खंडागळे यांचा सत्कार  पत्रकार दत्तात्रय पवार यांच्या हस्ते करण्यात आला.


        सदर प्रसंगी माजी नगरसेवक आनंद घोंगडे, अंबादास कदम ,माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासो वाघमोडे, डॉ परेश खंडागळे ,डॉ. संतोष पाटील ,डॉ. बिपिन जगताप ,डॉ. महावीर आलदर ,डॉ. विनायक डमकले, पत्रकार विठ्ठल देशपांडे, महेश जम्मा, सचिन धांडोरे ,चांगदेव कुंभार, वृत्तपत्र एजंट सौ. संगीता चौगुले ,सौ. सिंधू जानकर, सौ. लतिका मेटकरी, सौ .बनुताई जाधव ,अशोक जानकर, संजय पवार, बाबुराव पवार ,भानुदास जाधव, बाळू निमकर, जावेद सय्यद, बाबू चांदणे, गोरख भंडगे, विकास बोत्रे ,संतोष गाडेकर, पांडू खटकाळे, राम निमकर, सानिका सावंत, सतीश जाधव, हरिदास मेटकरी, समाधान धांडोरे, सुदर्शन वाघमारे ,अक्षय क्षीरसागर ,संजय येलपले, सौ. स्वप्नाली पवार ,सुनील पवार, अविनाश जानकर, उपस्थित होते शेवटी संघटनेचे खजिनदार उत्तम काका चौगुले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment