Recent Tube

Breaking

Saturday, September 30, 2023

नगरपालिकेच्या निवडणुका लवकर घेऊन शहराच्या विकासाला गती द्यावी - आनंदाभाऊ माने



नगरपालिकेच्या निवडणुका लवकर घेऊन शहराच्या विकासाला गती द्यावी - आनंदाभाऊ माने


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष, नगरसेवकांचा कार्यकाल संपून पावणेदोन वर्षाचा कालावधी झाल्यामुळे सांगोला शहराचा चौफेर विकास थांबला आहे. मुख्याधिकारी आणि प्रशासक असे दोघे मिळून संयुक्तपणे नगर परिषदेचे कामकाज पहात असले तरी शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी असणे महत्वाचे आहे. 

राज्य सरकारने नगरपालिकेच्या प्रलंबित निवडणुका घेऊन शहराच्या रकलेल्या विकासाला गती द्यावी व जनतेचे रखडलेली कामे मार्गी लावावीत. अशी मागणी सांगोला नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक आनंदा भाऊ माने यांनी केली आहे. नगराध्यक्ष, नगरसेवकांचा कार्यकाळ संपून पावणे दोन वर्षाचा कालावधी झालेला आहे. 

त्यानंतर निवडणुका होणे अपेक्षित असताना या झाल्या नसल्यामुळे सांगोला शहरातील जनतेला सध्या कोणीच वाली उरलेला नाही. नगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रभागातील विकास कामे थांबल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. स्वच्छता, आरोग्याचा बोजवारा उडाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

सरकारने पूर्ण वेळ मुख्याधिकारी यांची नियुक्ती करावी तसेच नगरपालिकेच्या थांबलेल्या निवडणुका त्वरित घेऊन शहराच्या विकासाला गती द्यावी अशी मागणी सांगोला नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक आनंदा भाऊ माने यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment