धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा धनगर समाज शांत बसणार नाही- हरिभाऊ पाटील.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
धनगर आरक्षण मिळण्यासाठी आम्हाला भाजपच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहे. या केंद्र सरकारने ३७० वे कलम हटविले, राम मंदिराचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न सोडविला, जे कधी सुटणार नाहीत असे वाटणारे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सोडविले आहेत.
राज्यातील सरकारमध्ये भाजपला सत्ते आणण्यासाठी धनगर बांधवाचा सिंहाचा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनापुढे बोलताना फडणवीस म्हणाले होते की धनगर आरक्षणाचा माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे. आमचे सरकार आले की पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न मार्ग लावू.
मात्र फडणवीस यांनी पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला, आता दुसऱ्यांचा सत्ता मिळाली आहे. तरीही आमची मागणी मान्य झालेली नाही. आरक्षणाशिवाय धनगर समाजाच्या इतरही अनेक प्रश्न आहेत, तेही सोडविण्याची आमची मागणी आहे असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना घेरडी येथे केले आहे.धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवगार्तून (ST) आरक्षण द्यावं या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील घेरडी येथे आंदोलन करण्यात आले होते.विशेष करून हे आंदोलन सामाजिक नेते इंजि रामचंद्र घुटूकडे यांच्या वतीने घेरडी गावात करण्यात आले होते.
पुढे बोलताना हरीभाऊ पाटील म्हणाले कि धनगर समाज मागील पंचाहत्तर वर्षापासून राज्यघटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अमलबजावणीची मागणी करीत आहे. अनेकदा अंदोलनेही झालेली आहेत. प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून जाहिर भूमिका घेतात. मात्र आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात काहीच कृती होत नाही. यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सरकारला ठोस निर्णय घ्यावाच लागेल अन्यथा धनगर समाज शांत बसणार नाही असा इशारा हरीभाऊ पाटील यांनी दिला आहे.


No comments:
Post a Comment