विद्यामंदिर हायस्कूल वाकी शिवणे प्रशालेत संस्कार शिबिर संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
विद्यामंदिर हायस्कूल वाकी शिवणे प्रशालेत प्रशालेचे मुख्याध्यापक मा श्री अवताडे सर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मार्मिक शब्दांत विचार प्रकट केले. तथापि शिवणे येथील मा बाळासाहेब वाळके यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे बालसंस्कार रुजविले गेले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागृत करण्याचा प्रयत्न केला.
याशिवाय विद्यार्थ्यांना व्यसनापासून कसे परावृत्त करता येईल. यासाठी योगा आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे असे संबोधित केले. याशिवाय अलीकडे मुले मोबाईल मध्ये सतत आपले मन एकाग्र करतात तर त्यापासून मुलांना कसे परावृत्त करता येईल यासाठी चांगल्या उपयुक्त टिप्स दिल्या.
तसेच मुले मोबाईल पासून दूर होतील इतर घातक व्यसनापासून दूर होतील याविषयी चांगल्या प्रकारे विचारांचे सुमत मुलांवर बिंबवण्यात गेले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन फाळके सर यांनी केले.


No comments:
Post a Comment