शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात हरिभाऊ पाटील यांनी प्रवेश केल्यामुळे त्यांचा युवा सेनेच्या वतीने सत्कार संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केल्यामुळे. युवा सेनेच्या वतीने सांगोला येथे शुक्रवार दिनांक 7 जुलै2023 रोजी 2.30 वाजता युवा सेना उपजिल्हाप्रमुख मा रघुनाथ गायकवाड यांच्या शुभहस्ते मा हरिभाऊ पाटील यांचा फेटा, शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
त्यावेळी फटाक्याची आताषबाजी जोरात करण्यात आली. या सत्कार वेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख रघुनाथ गायकवाड,युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, युवासेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी, युवासेना शहरप्रमुख सौरभ चव्हाण, विद्यापीठ कक्ष जिल्हाउपाध्यक्ष ऍड. समाधान दिवसे, शिवआरोग्य सेना तालुका समन्वयक नवल गाडे , युवासेना तालुका उपप्रमुख रणजित रुपणर,शाखाप्रमुख - समाधान चव्हाण, दादासाहेब पाटोळे,संतोष टाकळे, शरद गुरव, सचिन सुरवसे.युवासेना शाखाप्रमुख - संजय करे माजी उपतालुका प्रमुख संतोष वसमळे, उपविभागप्रमुख रघुनाथ ऐवळे, अक्षय रुपणर व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment