Recent Tube

Breaking

Friday, July 7, 2023

सांगोला तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी भारत कदम तर, उपाध्यक्षपदी विकास गंगणे यांची निवड.



सांगोला तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी भारत कदम तर, उपाध्यक्षपदी विकास गंगणे यांची निवड.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी पुढारीचे तालुका प्रतिनिधी भारत कदम, उपाध्यक्ष पदी विकास गंगणे, सचिव पदी लोकमतचे तालुका प्रतिनिधी अरुण लिगाडे ,सहसचिव पदी मिर्झा गालिब मुजावर खजिनदार पदी रोहीत सुर्यगंध यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर नुतन पदाधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

सांगोला तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेची बैठक काल शुक्रवारी विद्यमान अध्यक्ष सचिन भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीस संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक हमिदभाई इनामदार, जेष्ठ पत्रकार एम एम पठाण , नागेश जोशी , निसार तांबोळी, सुरज लवटे, हमीद बागवान सुरेश गंभीरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.या बैठकीत वरील प्रमाणे सर्वानुमते नूतन पदाधिकारी कार्यकारणीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या यावेळी निसार तांबोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment